शनिवार, मे ३१, २००३

संस्कृतिची लाट - आपली संस्कृति बुडणार का?

भारतात पाश्चात्य संस्कृतिची जणू लाटच आली आहे. आज आपली पिढी Nike, Reebok, Adidas च्या मागण्या करते, ते चांगले म्हणून नाही, त्याची त्याना गरज़ आहे म्हणून नाही, पण ते ”कूल” आहे म्हणून. निशिद्ध पदार्थांचे प्रचलन रॉक संगीतासहित एखाद्या रोगाच्या साथीप्रमाणे पसरत आहे. मुले आपल्या आई-वडिलांना "आम्ही १८ वर्षाचे झालो, आता तुमचे आमच्यावर हक्क गाज़वण्याचे दिवस गेले" असे काही ऐकवून देत आहेत. किती दयनीयावस्था ही?

मी काल दोन मित्रांशी चर्चा करत असताना असा विशय निघून आला कि पुढील ५-१० वर्षात भारतात विवाहपूर्वमैथुनाचे प्रसंग वाढणार आहेत. आता माझा त्याला तसा विरोध नाही, पण विवाहाने एका वैय्यतिक व सामाजिक ज़बाबदारीची जाणीव होते. ज़र विपूमैस प्रोत्साहन मिळाले, तर मग ती जाणीव राहणार नाही, व आता अमेरिकेत जी सामाजिक परिस्थिती आहे तशी निर्माण होईल.

माझे असे ठाम मत आहे कि एका समाजाच्या तरुण पिढीवरून त्या सामाजाची नाडी ओळखता येते, आणि मी काही वैद्य नाही, पण भारताच्या तरुण पिढीकडे पाहून मला तरी असे वाटते के आपण एका सामाजिक भोवर्यात अडकत चाललो आहोत. मिठीबाई कॉलेजात घडलेले मुलींचे वेश्याकांड, समलैंगिक संस्थांचे वाढते बळ, गांजा चरस इत्यादि पदार्थांची वाढती उपलब्धी व अंततः ”वॅलेंटाइन्स डे” सारख्या फाजिल काल्पनिक दिनांचे वाढते महत्त्व, हे सर्व दर्शक आहेत एका अश्या भविष्याचे जेव्हा भारत केवळ अमेरिकेची एक ताम्रचर्मित प्रति बनून राहणार आहे.

हा दिवस कधी उजाडेल, ते मी सांगू शकत नाही. मी हे ही सांगू शकत नाही कि त्याला थांबवण्यासाठी काय करायला हवे. मात्रे हे निश्चित आहे, हे थांबवले नाही तर आपण अमेरिकेचे दास बनु, ज़से आपले पुर्वज काही शतकांपुर्वी आंग्लांचे दास बनले.

सार इतके, भारताचे आर्थिक आणि सामाजिक धोरण असे असले पाहिजे ज्यानी भारतीय पदार्थांचा दर्जा विश्वस्तरावर गेला पाहिजे, पण पाश्चात्य पदार्थांची नक्कल न करता. म्हण्जे भारतीय हॅमबर्गर विश्वप्रसिद्ध झाले तरी ते अमेरिकी हॅमबर्गरांची प्रतीच राहणार, त्या उलट ज़र वडापाव जगप्रसिद्ध झाला तर भारतीय संस्कृतिची बिजे परप्रांतांमध्ये मुळे धरतील.

या विषयावर श्री. दत्तोपंत थेंगडी यानी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातले एक म्हणजे "Third Way". बघा सापडते का आपल्या ज़वळच्या वाचनालयात.

मंगळवार, मे २७, २००३

डॉ. नितु मांडके

करंगळीवर माणूस मेरु पर्वत उचलू शकतो हे डॉ. मांडक्यांनी स्वतःच्या उधारणातून दाखवले आहे.

त्यांचा मित्र, शिरिश गणू यानी डॉ. मांडक्यांच्या एक हृदयविकार रुग्णालय बांधण्याच्या स्वप्नाला साकार करण्याचा प्रण घेतला आहे. "डॉ. नितू मांडके फाउंडेशन" च्या १७ मजली साडेआठ लाख चौरस फूटाच्या इमारतीचे बांधकाम नुकतेच सुरु झाले, व अशी आशा आहे कि या वर्षाखेरिस पहिल्या तप्प्याची सांगता होईल.

काही दिवसांपुर्वी डॉ. मांडक्यांच्या निधनाची बातमी ऐकून असे वाटले कि भारतात दिवसेनुदेवस ज्या हृदयविकाराला अनेक लोक बळी पडतात त्याला लढा देण्यासाठी जी चिकित्सा आणि शस्त्रक्रिया लागेल तिला आता धक्का बसणार, पण ही बातमी ऐकून असे वाटते कि पुढे आशेचे किरण दिसतील कदाचित.

डॉ. मांडक्यांचे नेहमी असे मत होते कि पाश्चात्य देशातून लोकाना भारतात शस्त्रक्रिया कारण्यासाठी येण्यास प्रोत्साहित करायला हवे, व त्यांच्या या फाउंडेशनमुळे भारताला व महाराष्ट्राला हृदयविकार चिकित्सकांना आर्थिक हातभार लागेल.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता...

सोमवार, मे २६, २००३

हा एक मराठी ब्लॉग आहे, जिथे मी माझे विचार लिहिणार आहे, एका संयुक्त महाराष्ट्राचे आणि एका प्रबल मराठी संस्कृतिचे स्वप्न पाहणार आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी बहुदा माझे पूर्णायुश्य लागेल, कदाचित ते ही पुरेसे पडणार नाही. पण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, म्हणून आज संकल्प सोडत आहे.